पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील गरजूंना मदतीचा हात देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या गोरगरीब कुटूंबाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप नगरसेवक शत्रुघ्न काटे तसेच पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचाव व्हावा यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पिंपळे सौदागरमधील नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनचा या संपूर्ण परिस्थितीशी लढण्याकरिता सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या काळात ज्या गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता आहे अशांना नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या वतीने ५०० ते ६०० प्रांतिय, परप्रांतीय गरजु गरीब कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला. पवना सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते नागरिकांच्या सेवेस उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group