पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी परिसरातील गरजूंना शरद धोंडीबा जांभूळकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर सरकारने लॉकडाऊन जाहिर केलायं. त्यामुळे हातावरचं पोट असलेल्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आलीयं. म्हणूनच सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत हिंजवडीतील सामाजिक कार्यकर्ते शरद धोंडीबा जांभूळकर यांनी गरजू कुटूंबांसाठी मदतीचा एक हात दिलायं. हिंजवडी परिसरातील ६० गरजू कुटूंबांना किराणा सहित्याचे सोशल डिस्टंसिंगचा वापर करून वाटप केले आहे.
वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, साबण, बिस्कीट पुडे आदी वस्तू देण्यात आल्या. अंदाजे १०-१२ दिवस पुरेल एवढे साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत सौ.दिपाली शरद जांभूळकर, माऊली काकडे, चंद्रकांत बलकवडे, शुभम गवारे, प्रशांत खारूने, माऊली जांभूळकर, सागर माळी, अजित ओझरकर, अक्षय बलकवडे आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group