पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल एकाच दिवसांत शहरात २२ ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली असताना आज (दि.१९) दिवसभरात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहेत. सकाळी भोसरी येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर आता भोसरी येथीलच ७८ वर्षीय वृध्दाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दुपारी दिलेल्या माहितीनुसार भोसरी येथील ७८ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान सकाळी देखील भोसरी येथील एका ४० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनाचा हा एकाच दिवसातील दुसरा बळी असून आजपर्यंत शहरातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हद्दीबाहेरील ८ जणांचा शहरातील रूग्णालयात आजपर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरात सध्या ८४ कोरोना बाधित रूग्ण आहेत. तर आजपर्यंतच्या कोरोनाच्या ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांची संख्या २३३ वर पोहचली आहे. त्यातील १३२ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.






















Join Our Whatsapp Group