पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्त्या व दापोडी येथील रुद्रराज महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. सुप्रियाताई शशांक साळवी (काटे) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल सेच्या मुख्य संघटिकापदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.
पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. महेश झपके यांनी त्यांची आज मुख्य संघटिका पदी निवड केली. व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी – चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष श्री. संजोगभाऊ वाघेरे – पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
सुप्रिया शशांक साळवी (काटे) या रुद्रराज महिला प्रतिष्ठान मार्फत गेल्या दीड वर्षा पासून सामाजिक कार्य करीत आहेत. आता लॉकडाऊनच्या काळात देखील त्यांनी अनेकांना धान्य वाटप करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.























Join Our Whatsapp Group