पिंपरी (Pclive7.com):- नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर अनेक नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे त्यांना मदतीचा हात पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनने दिला आहे. सुमारे ७०० कुटुंबांना अन्न धान्य व घरउपयोग वस्तूंचे वाटप करण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण समुद्र किनारपट्टीवर प्रचंड प्रमाणात घरांचे नुकसान झालेले आहे. ज्यात घराचे छत उडुन गेल्यामुळे अन्नधान्य, व बरेच नुकसान झाले आहे. तसेच लाईटचे पोल पडल्यामुळे सर्व ठिकाणच्या लाईट बंद झाल्या आहेत. म्हणून एक हात मदतीचा उन्नती फाउंडेशन पुढे केला आहे. उन्नतीकडून नेहमी संकट काळात मदतीसाठी पुढे केला जातो. उन्नती फाउंडेशन तर्फे रत्नागिरी येथे दापोली भागातील गावांमध्ये सुमारे ६०० ते ७०० कुटुंबाना अन्नधान्य वाटप केले. त्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ चिंचवडचा राजा या चिंचवड मधील मंडळाचे सहकार्य होते.























Join Our Whatsapp Group