पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महिलेचा आज (दि.१३) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ३८ नवे ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल ७३ जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. दरम्यान शहरात सध्या ४९४ ॲक्टिव्ह रूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दापोडी येथील ५६ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात शहरातील नाणेकर चाळ पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, रमाबाई नगर पिंपरी, दापोडी, आनंदनगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, नेहरुनगर, अजंठानगर, जुनी सांगवी, गुलाबनगर दापोडी, साईबाबा नगर चिंचवड, बिजलीनगर, वैभवनगर पिंपरी, तापकीर नगर काळेवाडी, नढेनगर काळेवाडी, नवी सांगवी येथील ३८ जणांचे आणि सिंहगड रोड, खडकी येथील ५ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधित रूग्णांची संख्या ११४८ वर पोहचली आहे. दरम्यान आज दिलासादायक बाब म्हणजे एकच दिवसात शहरातील आनंदनगर, मोरेवस्ती, रामनगर चिंचवड, ताथवडे, नाणेकर चाळ पिंपरी, महात्मा फुलेनगर वायसीएम, आनंदनगर जुनी सांगवी, लिंक रोड पिंपरी, गुलाबनगर दापोडी, जनतानगर चिंचवड, बौध्दनगर पिंपरी, दत्तनगर वाकड, अजंठानगर, मोरवाडी, पाटिलनगर चिखली, ढोरेनगर सांगवी, निगडी, पिंपळे गुरव, सदगुरु कॉलनी वाकड, लिंबोरे वस्ती दापोडी, चिंचवड स्टेशन, शिंदेनगर जुनी सांगवी, इंदिरानगर चिंचवड, रुपीनगर, खेड, जुन्नर, बोपोडी येथील ७३ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने त्यांना ‘डिस्चार्ज’ देण्यात आला असून आजपर्यंत एकूण ६१७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
🚨 पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स 🚨
शनिवार दि.१३ जून २०२० 📲 अपडेट्स सायं ६.१५ वाजेपर्यंतचे 📲
🚹 आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह = ११४८
🚹 आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ३८
🚹 आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ०५
🚹 सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = ४९४
🚹 एकूण मृत संख्या = ३८ (आज मृत =०१) (Pcmc १९ + १९ शहराबाहेरील)
🚹 एकूण कोरोनामुक्त रूग्ण = ६१७ (आज ७३ रूग्ण डिस्चार्ज)
🚹 आज दाखल संशयित रूग्ण = १२७५
🚹 आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = ११०२
🚹 प्रतिक्षेतील अहवाल = २९३
🚹 आज होम क्वारंटाईन = ४७१ (एकूण = २११२२)🚹 दैनंदिन सर्व्हेक्षण = ७५०८४























Join Our Whatsapp Group