पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील जुन्या रुग्णालयातील एका वॉर्डबॉयला कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या केबीनसमोर वॉर्डबॉयची ड्युटी होती. त्यामुळे वॉर्डबॉयच्या संपर्कात आलेल्या पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. तेथील डॉक्टर, नर्ससह १५ जणांना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले असून सर्वांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भोसरीतील जुन्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वॉर्डबॉयला त्रास होत होता. त्यामुळे त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी रात्री त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा वॉर्डबॉय भोसरीतीलच रहिवाशी आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या केबीनसमोर त्याची ड्युटी होती. त्यामुळे वॉर्डबॉयच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमधील पाच जणांचे नमुने तत्काळ तपासणीसाठी पाठविले आहेत. डॉक्टर, नर्ससह १५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.























Join Our Whatsapp Group