पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनमुळे बलुतेदार गुरव समाजातील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व बलुतेदार गुरव समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवार दि. 24 जून 2020 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व सर्व तहसिलदार कार्यालयांसमोर राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंदोलनाचे समन्वयक व महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या आंदोलनांतर्गत पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आकुर्डी प्राधिकरणातील तहसिलदार कार्यालयासमोर बुधवारी दि. 24 जून 2020 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत सोशल डिस्टन्स पाळून पारंपारिक वेशात, तुतारी वादन, शिंग वादन, शंख नाद करीत प्रमुख पदाधिकारी आंदोलन करणार आहेत. आंदोलनानंतर महासंघाचे प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहेत.























Join Our Whatsapp Group