पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महिला संघटन मजबूत करण्याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभानिहाय महिला अध्यक्षा पदावर सक्षम महिलांची निवड केली जाणार आहे. त्यासाठी शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी इच्छुक महिला कार्यकर्तींचे अर्ज मागविले आहेत.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघावर स्वतंत्र महिला अध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. तसे आदेश महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांना दिले आहेत. त्यानुसार काळभोर यांनी इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत.
तिन्ही विधानसभा मतदार संघातील इच्छुक महिलांचे शनिवार (दि.१२) पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. रविवार (दि.१३) आणि सोमवार (दि.१४) रोजी प्रदेशाध्यक्षा चाकणकर इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी इच्छुक महिलांनी शनिवारपर्यंत आपले अर्ज जमा करावेत, असे आवाहन काळभोर यांनी केले आहे.























Join Our Whatsapp Group