पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या मनोज पाटील या तरूण कार्यकर्त्याने सोशल मीडियावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लील भाषेत टीका केल्याने युवासेनेच्या वतीने वाकड पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई, युवासेना विस्तारक सचिन बांगर, राजेश पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा युवा जिल्हा समन्वयक सचिन सानप, युवासेना जिल्हा अधिकारी सुरज लांडगे, युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र ननवरे, रूपेश कदम, अजिंक्य उबाळे, भोसरी विधानसभा अधिकारी कुणाल जगनाडे, पिंपरी विधानसभा युवती अधिकारी प्रतीक्षा घुले भोसरी विधानसभा चिटणीस अमित शिंदे यांनी आक्रमक होऊन मनोज पाटील राहत असलेल्या वाकड येथील सोसायटीच्या आवारात जोरदार निदर्शने केली.
काही दिवसांपासून मनोज पाटील जळगाव येथे आपल्या गावी गेल्याची माहिती मिळताच युवासेना पदाधिकाऱ्यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्याला जळगाव येथून लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तात्काळ अटक न केल्यास कायदा हातात घेऊन जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही युवासेनेने दिला आहे.
याप्रसंगी अविनाश जाधव, निलेश हाके, सागर शिंदे, प्रविण पाटील, अनिकेत येरुणकर, गौरव आसरे, गणेश सस्ते, नितीन बोंडे यांच्यासह पिंपरी चिंचवड व भोसरीतील युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण केलेल्या चुकीच्या पोस्टमुळे अडचणीत आल्याचे दिसताच मनोज पाटील याने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरील पोस्ट डिलीट करून माफीनाम्याची पोस्ट टाकली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना बदनाम करण्यासाठी बेरोजगार तरुणांना ४० पैसे प्रति पोस्टचे आमिष दाखवून तरुण पिढी उध्वस्त करण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वृत्तीचा जाहीर निषेध युवासेनेकडून करण्यात आला.























Join Our Whatsapp Group