पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिंचवड विधानसभेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. चिंचवड विधानसभा अध्यक्ष , सरचिटणीस म्हणून कुंदा भिसे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मोर्चाची कार्यकारणी नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी महापौर माई ढोरे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चोंधे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मलाताई कुटे, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, विजय फुगे, पवना बँकचे उपाध्यक्ष जयनाथ काटे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे : कुंदा भिसे यांची निवड चिंचवड विधानसभा अध्यक्ष, सरचिटणीस म्हणून केली आहे. सोनम मोरे याची निवड सरचिणीस, उपाध्यक्ष सरिता नेवाळे आणि रंजना चिंचवडे यांची निवड झाली आहे. तसेच, कोषाध्यक्षपदी अस्मिता भालेकर, चिटणीस निकिता गोसावी यांना संधी दिली आहे.
ओबीसी महिला आघाडी अध्यक्ष सारिका पवार यांची निवड झाली. सांस्कृतिक महिला आघाडी अध्यक्ष नंदा फुगे यांची निवड झाली.






















Join Our Whatsapp Group