पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड परिसरातील शिवामृत ग्रुपच्या वतीने विविध क्रीडा क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना उत्कृष्ट संघटक व जीवन गौरव पुरस्कार देवून महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवामृत ग्रुप संचालक दत्तात्रय भोसले व शिवामृत ग्रुप पुरस्कार मुख्य आयोजक सुनील साठे उपस्थित होते.
सत्कार झालेले मान्यवर –१) राजू थापा (कराटे) जीवन गौरव पुरस्कार २) गणेश सिन्हा (कराटे) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार ३) सहाद शेख (बॉक्सिंग) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार ४) अनिल लोखंडे (कबड्डी) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार५) सतीश राजहंस (थाई बॉक्सिंग) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार ६) संतोष म्हात्रे (किक बॉक्सिंग) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार ७) मुकेश पवार (हॅडबॉल) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार ८) पाशा आत्तार (थाई बॉक्सिंग) जीवनगौरव पुरस्कार ९) फिरोज शेख (हॉकी) जीवन गौरव पुरस्कार १०) राजू कोतवाल (क्रिकेट) जीवन गौरव पुरस्कार ११) आशिष उबाळे (बॉक्सिंग) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार १२) मृदुला महाजन (स्वॉफ्ट बॉल) उत्कृष्ट क्रीडा संघटक पुरस्कार
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी उपस्थित खेळाडू व मार्गदर्शक यांना शुभेछा देऊन भविष्यात उत्तम कामगिरी करून शहराच्या लौकिकात भर पडावी असे मत व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group