पिंपरी (Pclive7.com):- महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. याविरोधात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने उद्या, दि.१२ ऑक्टोबर २०२० रोजी भोसरी येथे ‘आक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांड तसेच कोरोना महामारी सारख्या अति संवेदनशील काळातही कोविड सेंटर व हाॅस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र सुरूच आहे.
वारंवार तक्रारी, निवदने व आंदोलन करून देखील या असंवेदनशील आघाडी सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव तीव्र राज्यव्यापी आंदोलन ’भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या’ वतीने छेडण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात पक्षाच्या वतीने होणाऱ्या या ’आक्रोश आंदोलनात’ आपण आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात होणार आंदोलन…
भाजपा महिला मोर्चोच्या वतीने सोमवारी, दिनांक १२ आक्टोंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पी.एम.टी. चौक, भोसरी उड्डाणपूला समोर, भोसरीगांव येथे आक्रोश आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group