पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्ते रवी भिलारे यांचा वाढदिवस १६ ऑक्टोंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून रवी भिलारे सोशल फाउंडेशनच्यावतीने थेरगावमध्ये रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण करण्यात आले.
पीसीएमसी ब्लड बँक यांच्या सहकार्याने तसेच प्रभागातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरामध्ये थेरगावच्या इतिहासात प्रथमच अभूतपूर्व अशा प्रमाणात १०६ व्यक्तींनी रक्तदान केले. तसेच गुजरनगर आणि बेलठीकानगर मध्ये १ हजार वृक्षवाटप करण्यात आले.
पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे जपत आपण समाजसेवकच आहोत हे पुन्हा एकदा रवी भिलारे यांनी दाखवून दिले. या अभूतपूर्व रक्तदानाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पीसीएमसी ब्लड बँकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी रवी भिलारे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले. हीच खरी आपल्या कामाची पोचपावती आहे असे समजून रवी भिलारे यांनी देखील त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त केले.
भविष्यात देखील कितीही मोठ्या पदावर आपण पोहोचलो तरी समाजसेवक म्हणूनच काम करण्याचा निर्धार असणार आहे असे रवी भिलारे यांनी सांगितले. माणसे जोडणे हाच आपला धर्म आहे. ज्यांना जिथे माझी गरज लागेल त्यांनी फक्त मला एक हाक द्यावी, अडचणीत असेलेल्या प्रत्येकाला सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही रवी भिलारे यांनी यावेळी दिली.























Join Our Whatsapp Group