पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा समिती सभापती, नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे साफसफाई कामगारांना मिठाई वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरात साफसफाई मध्ये सर्वात स्वच्छ म्हणून निगडी प्रभाग अग्रस्थानी असतो. नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रभागातील साफसफाई कामगार यांच्या बाबतीत असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या बरोबर नगरसेविका कमल घोलप यांनीही कायम एकमेकांना साथ देत कामगारांना सहकार्य केले आहे.
नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले की, आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. कोरोना काळात सुद्धा जीवाची पर्वा न करता प्रभागात स्वच्छता व साफसफाई चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांनी केली. स्वतःच्या घरातील स्वच्छतेचे काम आणि प्रभागातील काम एकच आहे असे समजून कर्मचारी काम करत असतात. आपणास अविरत सेवा देत असतात याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत.
साफ सफाई कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, औषध व धूर फवारणी कर्मचारी, ड्रेनेज कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी व विद्युत कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त मिठाई देऊन सन्मान करण्यात आला व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रभागातील नगरसेविका कमल घोलप, आरोग्य निरीक्षक महेश आढाव, भाजप मंडल उपाध्यक्ष बाबा परब, अनिल वाणी, शेखर आसरकर, धनाजी मोरे, जयश्री देशमाने, शिरीष जेधे, आदित्य कुलकर्णी, गिरीश देशमुख, मुक्ता गोसावी, रुपल माने, प्रशांत बाराथे, प्रभू बालचंद्रन, कौस्तुभ देशपांडे, पंकज कोळी, संजय येवलेकर, सुरज ओंबळे, अभि साने, राकेश बाराथे व प्रभागातील सर्व साफसफाई कर्मचारी आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group