पिंपरी (Pclive7.com):- भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे एका बेवारस रुग्णाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले. या सेवाभावी कार्याबद्दल भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी रवी जांभुळकर यांना केसबी चौक येथे माथाडी कामगार नेते आण्णासाहेब पाटील पुतळा परिसरात एक बेवारस व्यक्ती अन्नपाण्याविना झोपलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही बाब भाजयुमोच्या अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली.
त्यानंतर काही क्षणात भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते केएसबी चौकात अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याजवळ जमा झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत भाजयुमोचे नेते अमित गोरखे यांनाही घटनास्थळी पाचारण केले.
संबंधित बेवारस रुग्णाची अवस्था पाहून त्यांनी त्वरित १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावून घेतले. तसेच या रुग्णाला पुढील उपचारासाठी वायसीएममध्ये दाखल करण्यात आले.
यावेळी अमित गोरखे, संकेत चोंधे, दिनेश यादव, रवी जांभुळकर, पुजा आल्हाट, मुक्ता गोसावी, शिवराज लांडगे, प्रकाश चौधरी, युवराज ताठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group