पिंपरी (Pclive7.com):- भोसरी परिसरात पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख ७५ हजारांची ४ पिस्तुलं आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. रूपेश उर्फ संतोष सुरेश पाटील, वय-२८ रा. भोसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी पोलीसांनी ही कामगिरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रुपेश याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म ऍक्ट असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील मैदानात आरोपी रुपेश हा पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत आणि सुमित देवकर यांना मिळाली होती.
याबाबत वरीष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी परिसरातील पांजरपोळ याठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी रुपेशची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तुल, पिशवीत तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळली आहेत. त्यानुसार रुपेश याच्यावर आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, पोलीस निरिक्षक गुन्हे श्री.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस अंमलदार गणेश हिंगे, समीर रासकर, गणेश सावंत, सुमीत देवकर, आशिष गोपी, संतोष महाडीक यांनी सदरची कामगिरी केली आहे.






















Join Our Whatsapp Group