पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी आयटीनगरीत सुरू असलेल्या गुटखा रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत तब्बल ३० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवारी (दि.९) दुपारी दोनच्या सुमारास ही कारवाई केली.
परशुराम चौधरी मेघवाल, ललित गोविंदराम खारोल अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा पथकाचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, हिंजवडी येथे गुटख्याचे मोठे रॅकेट सुरू असून एका गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून ३० लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, एक टेम्पो व कार जप्त केली.
सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कारभाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलिसांचा खुलासा घेणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.






















Join Our Whatsapp Group