पिंपरी (Pclive7.com):- सोनिया गांधी यांचा त्याग व योगदान हे सदैव प्रेरणादायी आहे, देशाची प्रगती व देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी मनमोहन सिंग सरकारमध्ये सोनिया गांधी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले. भोसरी ब्लॉक काँग्रेस कमिटीतर्फे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार प्रत्येक ब्लॉक मध्ये रक्तसंकलन शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने आज भोसरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने माता रमाबाई आंबेडकर शाळा अजंठानगर येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण ४७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्रात रक्त पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो भरून काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रक्तसंकलन शिबिर घेण्यात येत आहेत.
सोनिया गांधी यांचा त्याग व योगदान हे सदैव प्रेरणादायी आहे, देशाची प्रगती व देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी मनमोहन सिंग सरकारमध्ये सोनिया गांधी यांचा सिंहाचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. यूपीए सरकारमध्ये देशाची झालेली प्रगती व मोदी सरकार मधील देशाची झालेली अधोगती हे आपण सर्वजण पाहतो आहे. जागतिक स्थरावर प्रगतिशील देशांमध्ये भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, यामध्ये धैर्यशील नेत्या सोनिया गांधी यांचे योगदान मोलाचे आहे, असे मनोगत व्यक्त करताना सचिन साठे यांनी सांगीतले.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया , महिला काँग्रेस अध्यक्षा गिरीजा कुदळे, भोसरी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादलाचे अध्यक्ष मकरधवज यादव, अल्पसंख्याक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, शहर काँग्रेसचे हिरामण खवळे, युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, विशाल कसबे गौरव चौधरी, जिफिन जॉनसन, सुनील राऊत, दिलीप पांढरकर, पांडुरंग जगताप, बाजीराव आल्हाट, राजेंद्र काळभोर, हर्षवर्धन पांढरकर आदी उपस्थित होते.
या उपक्रमास हिरामण खवळे, विशाल कसबे, आकाश खवळे, महादेव वाघमारे आदींनी विशेष पारिश्रम घेतले. तसेच मोरया ब्लड बँकेचे मकरंद शहपूरकर यांनी विशेष सहकार्य केले.






















Join Our Whatsapp Group