पिंपरी (Pclive7.com):- देशामध्ये विविध प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून जातीय दंगली घडवण्याचा पराक्रम भाजपा खासदार प्रज्ञासिंग ठाकूर करत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेला धोका त्यांच्यापासून निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा भारतीय लहुजी पँथरे प्रदेशसंघटक युवराज दाखले यांनी दिले.
यासंदर्भात युवराज दाखले वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, देशामध्ये विविध प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून जातीय दंगली घडवण्याचा पराक्रम भाजपा खासदार प्रज्ञासिंग करत आहेत. राष्ट्रीय एकात्मतेला धोका त्यांच्यापासून निर्माण झाला आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून देशाच्या समतेला व एकत्मतेला ठेच पोहचत आहे. १२ डिसेंबर २०२० रोजी मध्यप्रदेशातील सिहोर या ठिकाणी एका संमेलनात खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी चातुर्यवर्ण व्यवस्थेचे समर्थन करताना ४ वर्गाचा हवाला दिला. हे वक्तव्य करताना त्यांनी जी शब्दरचना सार्वजनिक ठिकाणी वापरली त्यामुळे अनुसूचित जातीचा आपमान झाला आहे. त्यांचे वक्तव्य जातीयवादाला खतपाणी घालणारे असून राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारे आहे.
प्रज्ञासिंग ठाकुर खासदार आहेत. त्यांचे अनुकरण आणि समर्थन करणारे अनेक लोक आहेत. त्यांनी जर असे वक्तव्य केले. तर याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होऊ शकतो. दि.१९ डिसेंबर रोजी प्रज्ञासिंग ठाकुर यांचा व्हिडीओ ट्विटरवर पाहिला आहे. यामुळे माझ्या मनाला ठेच पोहचली आहे. मी मातंग समाजातला युवक आहे. तरी याची गांभीर्यांने दखल घेऊन त्यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे युवराज दाखले यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group