पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औंधमध्ये घडला आहे. ही घटना सोमवारी रात्री १० वाजता औंध येथे घडली. गजानन वैजनाथ पारीश्वाड (वय ६०) असे आत्महत्या केलेल्या प्राचार्यांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
पारीश्वाड हे औंधमधील नागरस रोडवरील हर्ष पैराडाईज सोसायटीमध्ये राहात होते. त्यांनी सोमवारी रात्री १० वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्याने याबाबत तत्काळ सोसायटीतील नागरीकांना माहिती दिली.
सोसायटीमध्येच असलेल्या एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली, मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
पारीश्वाड यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पारीश्वाड यांची दोन्ही मुले जर्मनी व स्वीडन येथे वास्तव्यास आहेत. ते पत्नीसमवेत तेथे राहात होते.





















Join Our Whatsapp Group