पिंपरी (Pclive7.com):- भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.जानेवारी महिन्यात संक्रांतीपासून फेब्रुवारी महिन्यातील रथसप्तमीपर्यंत महिला संक्रातींच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले जाते. सुवासिनी महिला एकत्र येऊन हा समारंभ साजरा करतात. पूर्वी फक्त घरोघरी चालणारा कार्यक्रम हल्ली सार्वजनिकरित्याही अतिशय उत्साहात साजरा केला जातो. नुकताच रविदादा भिलारे सोशल फाउंडेशन व शिवदर्शन महिला बचत गट आणि सन्मित्र महिला बचत गट यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाला महापौर सौ.उषाताई उर्फ माई ढोरे, अंतरराष्ट्रीय खेळाडू सौ. संगीताताई कोकाटे, नगरसेविका सौ.ममताताई गायकवाड, नगरसेविका सौ.झामाबाई बारणे, शिक्षण सभापती सौ.मनिषाताई पवार, सौ.रोहिणीताई बारणे, सौ.कावेरीताई बारणे, सौ. विनिताताई माने, सौ. करिश्माताई बारणे, सौ.शालिनीताई गुजर, सौ.सोनालीताई गाडे, या सर्व मान्यवरांचा उपस्थित कार्यक्रम पार पडला.
यावेळी माई ढोरे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू संगिताताई कोकाटेंच्या अभिभाषणाने उपस्थितांची मने जिंकली. माईंनी सदैव महिलावर्गासोबत खंबीर पणे उभे राहुन साथ देण्याची ग्वाही दिली. तसेच झामाबाईंनी बचत गटाच्या उणिवा योजनांचे मार्गदर्शन करत ‘वंचित महिलांनी रविदादा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून सरकारी-निम सरकारी योजनांचा लाभ घ्यावा तसेच काही मदत लागल्यास आपण रविदादा सोशल फाऊंडेशनला वेळोवळी मदत करू’ असे आश्वासन दिले.





















Join Our Whatsapp Group