पिंपरी (Pclive7.com):- बॉन क्रेझी स्पोर्टस् क्लब, निगडी प्राधिकरण यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबाद प्रमाणे संदिप कदम मेमोरीयल कप २०२१ या भव्य टेनिस बॉल डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले होते. या स्पर्धेचे हे १० वे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटातील प्राधिकरण जिमखाना संघ तर ४० वर्षावरील व्हि.बी.पी.पनवेलचा संघ विजेता ठरला.
१९ ते २६ जानेवारी दरम्यान रंगलेल्या या डे – नाईट क्रिकेट स्पर्धेत विविध वयोगटातील संघाचा समावेश होता. यामध्ये १४ वर्षाखालील ४ संघ, वय वर्ष ४० वर्षावरील २० आणि खुला गटातील ३२ संघ असे राज्यभरातून विविध संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटातील प्राधिकरण जिमखाना संघ विजेता ठरला, विजेता संघास चषक व त्या सामन्यातील सामनावीरास स्पोर्टस सायकल देण्यात आली. ४० वर्षावरील व्हि.बी.पी. पनवेलचा संघ विजेता ठरला विजेता संघास २५ हजार व चषक शेखर भाऊ काटे या उपविजेता संघास १५ हजार तर खुला गटातील झागडे प्रतिष्ठाण, मुंबई हा संघ विजेता ठरला या स्पर्धेचा उपविजेता झारा इलेव्हन, पुणे ठरला विजेता संघास करंडक व रोख रक्कम २.५१ लाख उपविजेता संघास चषक व १.५१ लाख तर स्पर्धेत नियाजी ११ संघ तिस-या क्रमांकवर आला त्या संघास करंडकास १ लाखाचे व बॉन क्रेझी स्पोर्टस् क्लब, निगडी प्राधिकरण या संघास चौथा क्रमांकाचे ७५ हजाराचे बक्षीस देण्यात आले.
अंतिम स्पर्धेतील सामनावीराचा पुरस्कार झागडे प्रतिष्ठान चा खेळाडू सुमित डोंगरे याने १६ चेंडूत ३१ धावा करीत ३ षटकार व २ चौकार मारुन पटकावला तर मालिकावीराचा पुरस्कार बॉर्न क्रेझी संघाचा खेळाडू आरिफ संघम यांने मालिकेत १५३ धावा करीत पटकावला. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे म्हणून स्पोर्टस् सायकल देण्यात आली अशा आठ सायकली खेळाडूंना देण्यात आल्या त्याच प्रमाणे मैदानातील प्रेक्षकांना क्रिकेट संदर्भातील प्रश्न विचारुन त्यातील बरोबर उत्तरे देणा-या प्रेक्षकांना सोडतीव्दारे (लकी ड्रॉव्दारे) रोज एक स्पोर्टस् सायकलचेही वाटप करण्यात आले. तीन भाग्यवंत प्रेक्षकांना स्पोर्टस् सायकलचे वाटप करण्यात आले.
या स्पर्धेचा पारीतोषक वितरण समारंभ पुणे जिल्हाचे पालकमंत्री अजितदादा पवार तसेच मराठमोळा राष्ट्रीय खेळाडू केदार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धे दरम्यान मावळचे आमदार सुनिल शेळके, विधान परीषद आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते, जय अजितदादा पवार, पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर माई ढोरे, मंगला कदम,तुषार हिंगे, अमित गावडे, क्रिडा समिती अध्यक्ष उत्तम केंदळे आदीं उपस्थित होते. सदर स्पर्धेस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्याच बरोबर यू ट्यूब वर राज्यभरातील सुमारे १५ लाख प्रेक्षकांनी सदरची स्पर्धा पाहिली.























Join Our Whatsapp Group