पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या महामारीमुळे मागील अनेक महिन्यापासून शाळा बंद होत्या, आज पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्यासाठी राज्य शासनाचे सर्व नियम पाळून वर्ग सुरु करण्यात आले. विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कुंदा संजय भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये सॅनिटायझर मशीन बसवण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक बुधा नाडेकर, नगरसेवक शत्रुघ्न काटे, उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, गौरी कुटे, शंकर चोंधे तसेच शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कुंदा भिसे म्हणाल्या, कोरोना महामारीने संपूर्ण वर्ष अनेकांनी अनेक अनुभव घेतले आहेत. अनेकांनी आजाराचा सामना केला आहे. सध्या पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले आहेत. अनेक दिवस घरातच बसलेले विद्यार्थी आनंदाने शाळेत आले असले तरी त्यांच्या मनावर कोरोनाचे सावट आहे. शाळेत येताना व घरी जाताना सॅनिटायझरने हात साफ करण्यासाठी मशीन देण्यात आले आहे. वाढदिवसाच्या दिवशी इतर खर्च करण्यापेक्षा समाजाच्या हितासाठी काही तरी करावे म्हणून हा उपक्रम घेण्यात आला आहे.
नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, आपण समाजात जगत असताना समाजाच्या उपयोगी आले पाहिजे. कोरोना महामारीने माणसाला बरच काही शिकायला मिळाले आहे. कुंदा भिसे यांनी हा चांगला उपक्रम घेतला आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्याचें आरोग्य निरोगी राहाणार आहे. म्हणून अनेकांनी असे उपक्रम राबविण्याची गरज आहे.





















Join Our Whatsapp Group