पिंपरी (Pclive7.com):- गेल्या ६ वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे दर ७२.२६ पासून ९३.२७ तर डिझेलचे दर ५५.४८ पासून ८५.०९ अशी दर वाढ झालेली आहे. कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय बाजारात ५० डॉलर बॅरेल किंमत असताना पेट्रोल व डिझेल दरवाढ करून सामान्यांचे खिसे कापण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात पेट्रोल व डिझेल देण्याऐवजी दरवाढ केल्याने महागाईत देखील वाढ झाली आहे. अश्याप्रकारे सामान्य जनतेचे महिन्याचे अंदाजपत्रक बिघडवणाऱ्या मोदी सरकारचा आज (दि.५) पिंपरी चिंचवड शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकरी धंद्यांवर गदा आली आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवायची या चिंतेत सर्वसामान्य माणूस असताना सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे तो मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे या मोदी सरकारचा राज्यभर शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. पिंपरीतील फिनोलेक्स चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने मोदी सरकारचा धिक्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर सल्लागार मधुकर बाबर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, कार्यालय प्रमुख बशीर सुतार, पिंपरी समन्वयक रोमी संधू, हरेश नखाते, उपशहर प्रमुख अमोल निकम, नाना काळभोर, सय्यद पटेल, गोरख पाटील, माउली जगताप, सचिन चिंचवडे, प्रदीप दळवी, राजेश वाबळे, मच्छिंद्र देशमुख, विजय शिंदे, राजेश अडसूळ, गणेश वायभट वैशाली काटकर, गायत्री कोऱ्हाळे, महिला संघटिका भाग्यश्री म्हस्के आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group