पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे एकीकडे अनेकांचे कंबरडे मोडले असताना पिंपरी चिंचवडमधील शेतकरी कुटूंबातील नारायण बारणे यांनी त्यांचा मुलगा रोहित याच्या लग्नासाठी चक्क सोन्याची लग्नपत्रिका बनवली आहे. त्यांनी बनविलेल्या या अनोख्या लग्नपत्रिकेची सध्या पंचक्रोशित जोरदार चर्चा सुरू आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगावमध्ये राहणारे नारायणशेठ नागुभाऊ बारणे यांचे चिरंजीव रोहित यांचा रविवार दि.२८ फेब्रुवारी २०२१ रोजी विवाह संपन्न होणार आहे. या लग्नासाठी त्यांनी चक्क सोन्याची लग्नपत्रिका तयार केली आहे. एक-दोन नव्हे तर २५ सोन्याच्या लग्नपत्रिका बनवल्या आहेत. एका पत्रिकेला त्यांना तब्बल २५ हजार रुपये एवढा खर्च आला आहे.
मी शेतकरी आहे आणि दोन नंबरचा पैसा माझ्याकडे नाही. सोन्याची हौस आहे म्हणून मी माझ्या मुलाच्या लग्नासाठी सोन्याच्या लग्नपत्रिका बनवून घेतल्या आहेत. लग्नाला किमान १० हजार लोकं आली असती. मात्र कोरोनामुळे फक्त ५० लोकांना बोलावले आहे. त्यामुळे वाचलेला पैसा इकडे वापरला असल्याचे नारायण बारणे यांनी पीसी लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.






















Join Our Whatsapp Group