पिंपरी (Pclive7.com):- ऑनलाईनच्या नावाखाली शैक्षणिक संस्थाकडून होणारी लुट थांबवावी अशी मागणी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. पिंपरी युवासेनेच्या पदाधिकार्यांकडून सरदेसाई यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मावळ युवासेना विस्तारक राजेशजी पळसकर, अनिकेत घुले, प्रतीक्षाताई घुले, शर्वरी जळमकर, सागर शिंदे, अविनाश जाधव व पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके उपस्थित होते.
वरून सरदेसाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. मार्च २०२० ते मार्च २०२१ च्या काळात शैक्षणिक वर्षांत कुठल्याही प्रकारचे वर्ग चालू नसताना फक्त ऑनलाईन लेक्चरच्या नावाखाली जिमखाना फी, लायब्ररी फी, स्पोर्ट्स फी, या शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांकडून वसूल करत आहेत.
तरी या सर्व फीचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसत आहे. तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संस्थांना आपण समज देऊन सर्व फी माफ करून देण्यात यावी अशा मागणीचे पत्र वरून सरदेसाई यांना देण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group