पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री यांनी सन २०२१-२२ साठी सादर केलेला अर्थसंकल्प शहरातील सर्वसामन्यांच्या अपेक्षाभंग करणारा आहे. या अर्थसंकल्पातुन महाराष्ट्रामध्ये नाही तर मुंबईत महानगरपालिकेला भरघोस निधी दिला गेला आहे. यामध्ये इतर महानगरपालिकांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचे दिसुन येते.
कोरोना काळात पिंपरी चिंचवड महापालिकेने जवळपास ३०० कोटी रुपयांचा निधी खर्ची केला परंतु शासनाकडुन कमीत कमी १५० कोटी रकमेचा निधी मिळणे अपेक्षित असताना राज्य शासनाकडुन कुठलीही मदत नाही. अर्थसंकल्पातही त्याबाबत कुठलीही तरतुद नाही. शहरवासियांना वीज बीलात कुठलीही सुट दिली नसल्याने निव्वळ चेष्टा झाल्याचे अर्थसंकल्पातुन दिसुन येते. केंद्रशासनाकडुन रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा असे महत्वाचे प्रकल्प सुरु असुन ते या राज्य शासनाने आपल्या नावे खपविल्याचा प्रकार अर्थसंकल्पातुन दिसुन येतो.





















Join Our Whatsapp Group