पिंपरी (Pclive7.com):- उन्नती महिला मंच, साईनगर मामुर्डी तर्फे स्नेहा गाडे आणि सहयोजिका तर्फे आयोजित महिला दिनाच्या दिवशी आपापल्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक महिलांचे सन्मान पत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
त्यावेळी प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, चिंचवड किवळे मंडलाध्यक्षा पल्लवी वाल्हेकर, निशा येवले, मराठी सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी हस्ते संपन्न झाले.
त्याच बरोबर अनेक बचत गटातील महिलांचा मनोरंजनाचे खेळ घेऊन पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळेस अनेक क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. पोलिस, वाहतूक पोलीस, डॉक्टर, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कोरोना योद्धा व सिने अभिनेत्री यांचा सत्कार करण्यात आला.





















Join Our Whatsapp Group