पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या रूग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. रूग्णांना उपचारासाठी बेडची मोठी कमतरता भासत आहे. थेरगाव येथील महापालिकेचा नवीन दवाखाना बांधून पूर्ण झालेला आहे. त्याठिकाणी सर्व वैद्यकीय सामुग्रीची पूर्तता करून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. शहरातील महापालिकेची सर्व रुणालय फुल झाली आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी असलेले महापालिकेचे वाय.सी.एम. , जिजामाता, भोसरीचे कोविड हॉस्पिटल या सर्व हॉस्पिटलमध्ये सध्या एकही बेड शिल्लक नाही. सध्याच्या परिस्थितीत खासगी रुग्णालयात सुद्धा एकही बेड शिल्लक नाही.
त्यामुळे शहरातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकिय सामुग्री पुर्ण करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मनपा दवाखान्याच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group