पिंपरी (Pclive7.com):- राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध अधिक कडक केले आहेत. अत्यावश्यक सेवेशी संबंधित वगळता सर्व शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के उपस्थितीत सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही. लग्न समारंभ २५ लोकांच्या उपस्थितीत केवळ दोन तासांच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास वधू वर पक्षावर ५० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हॉल, मंगल कार्यालयाकडून उल्लंघन झाल्यास कोरोना संपेपर्यंत आस्थापना बंद करण्यात येईल, असे आदेश पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी जारी केले आहेत.
●१) कार्यालयातील उपस्थिती –
▪अ) सर्व शासकीय कार्यालये (राज्य केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये वगळता कर्मचार्यांच्या १५% उपस्थितीत सुरु राहतील.
• उपरोक्त कार्यालये/आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची परवानगी घ्यावी.
▪ब) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी निर्गमित केलेल्या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र. ५ (Exemption Category) मध्ये नमूद सर्व कार्यालये १५% किंवा ५ यापैकी जे जास्त असतील तेवढ्याच अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत सुरु राहतील.
▪क) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी निर्गमित केलेल्या दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशातील मुद्दा क्र.२ (Essential Category) मध्ये नमूद सर्व अत्यावश्यक सेवांची कार्यालये कमीतकमी आवश्यक कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत कर्मचारी उपस्थिती ५०% पेक्षा जास्त असणार नाही. अत्यावश्यक सेवा (Essential Services) प्रत्यक्ष पुरविण्याच्या कामी किमान मनुष्यबळ वापरावे. आवश्यकतेनुसार यामध्ये १००% पर्यंत वाढ करण्यास मुभा राहील.
●२) लग्न समारंभ –
▪ लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत केवळ २ तासांच्या कालावधीत एकच कार्यक्रम व एकाच हॉलमध्ये साजरा करणेस परवानगी राहील. सदर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वर वधू पक्षावर रक्कम रुपये ५०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित हॉल किंवा लग्न समारंभाचे ठिकाण यांचेकडून नियमांचा भंग झाल्यास मे.केंद्र शासन कोविड-१९ आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.
●३) खाजगी प्रवासी वाहतूक –
▪खाजगी बस वगळता इतर खाजगी प्रवासी वाहतूक आपत्कालीन व अत्यावश्यक कारणासाठी किंवा इकडील दिनांक १४.०४.२०२१ रोजीच्या आदेशात नमूद केलेनुसार वैध कारणांसाठी आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. सदर संबंधित वाहन चालक मालक हे ज्या ठिकाणी राहतात तेथेच वाहतूक करणे अपेक्षित आहे. यामध्ये आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित नाही.
▪आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यास खालील वैध कारणांसाठीच परवानगी राहील. याव्यतिरिक्त इतर कारणास प्रवास करणेस संपूर्णतः प्रतिबंध राहील. १) इकडील दिनांक १४.०४.२०११ रोजीच्या आदेशात नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Service)२) वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग असल्यास३) अंत्यसंस्कार४) कुटुंबातील व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा आजार असल्यास सदर नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर रक्कम रुपये १०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
▪आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करणेबाबतची नियमावली पोलीस प्रशासनामार्फत स्वतंत्र निर्गमित करण्यात येईल त्याचे काटेकोरपणे पालन करावे.
▪खाजगी बस आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
▪आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसर्या शहरात प्रवास करणेसाठी खाजगी बस यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.
• खाजगी बसेसचे वेळापत्रकानुसार एका शहरात फक्त दोन बस धाब्यावर बस थांबवता येईल. बसवे वेळापत्रक बस सेवा पुरविणाऱ्या ठेकेदारांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला वेळोवेळी कळवावे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभाग खाजगी बसेस च्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार हवे ते बदल सुचवू शकतील.
• खाजगी बसने आंतर जिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाश्याच्या हातावर १४ दिवस Home Quarantine बाबतचा शिक्का संबंधित आस्थापना चालकांनी मारणे बंधनकारक आहे.
• सर्व बस थांब्यावर थर्मल गन (Thermal Scanner/Gun) याद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. जर प्रवाश्यांमध्ये कोविड १९ ची लक्षणे आढळून आल्यास अशा प्रवाश्यांना त्वरित जवळील कोचिड केअर सेंटर किंवा रुग्णालय यामध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
• स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सर्व बस थांब्यावर पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या प्रवाश्यांचे Rapid Antigen Tess (RAT) करणेकरिता मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील (Testing Lab) तंत्रज्ञाची नियुक्ती करावी. कोविड १९ चाचणी करिता लागणारा खर्च हा संबंधित आस्थापना/प्रवाशी यांनी करावा.
• सदर नियमांचे उल्लंघन करणान्या आस्थापना चालका विरुद्ध रक्कम रुपये १०,०००/- याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करून मे. केंद्र शासन कोविड १९ आपत्ती संपूर्णपणे संपत्ती असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येईल.
● ४) सार्वजनिक प्रवासी वाहतूक –
▪अ) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात खालील नमूद आस्थापनावरील अधिकारी/कर्मचारी यांनाच लोकल रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी राहील.
▪सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी (केंद्र, राज्य स्थानिक प्राधिकरण यांना सोबत ओळख पत्र असल्यास पास/तिकीट देण्यात यावे.
▪सर्व वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणारे Doctors paramedies lab technicians/hospital and medical clinic staff etc.) यांना सोबत अधिकृत ओळख पत्र असल्यास पास/तिकीट देण्यात यावे.
▪वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असणारी व्यक्ती तसेच अपंग व्यक्ती व त्यांच्या मदतीला एक मदतनीस यांना
▪ब) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजिक वाहतूक व्यवस्था (PMPML) अत्यावश्यक सेवेसाठीच आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील.
▪क) आंतर जिल्हा किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या रेल्वे व बसेस (MSRTC) यांनी खालील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
▪पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात रेल्वे अथवा बसने (MSRTC) प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची माहिती रेल्वे प्रशासन तथा MSRTC प्रशासन यानी वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापन विभागास देण्याची व्यवस्था करावी.
▪सर्व रेल्वे स्थानकावर व बस थांब्यांवर धर्मल गन (Thermal Scamer/Gun) याद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच प्रवाश्यांच्या हातावर १४ दिवस Home Quarantine बाबतचा शिक्का मारण्यात यावा. जर प्रवाश्यांमध्ये कोविड १९ ची लक्षणे आढळून आल्यास अशा प्रवाश्यांना त्वरित जवळील कोविंड केअर सेंटर किंवा रुग्णालय यामध्ये स्थलांतरित करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
▪स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सर्व स्थानकावर पिंपरी चिंचवड शहरात येणाऱ्या प्रवाश्याचे Rapid Antigen Test (RAT) करणेकरिता मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतील (Testing Lab) तंत्रज्ञांची नियुक्ती करावी. कोविड १९ चाचणी करिता लागणारा खर्च हा संबंधित प्रवाशी यांनी करावा.
● ५) उपरोक्त आदेश तसेच इकडील दि. १४.०४.२०२१. दि. १७.०४.२०२१ व दि. २०.०४.२०२१ रोजी निर्गमित केलेले आदेश/मार्गदर्शक सूचना कायम राहतील असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.
●दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील..
शहरातील कंपन्या, कारखाने पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहेत. २० एप्रिलच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील सर्व प्रकारची किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने, चिकण, मटण, मासे आणि अंडी विक्री करणारी दुकाने, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामाकरिता नागरिक अथवा संस्थासाठी साहित्याची निर्मिती करणारे दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. या आस्थापनामार्फत घरपोच पार्सल सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरू राहील.





















Join Our Whatsapp Group