पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील दारिद्र रेषेखालील नागरिक व कचरा, काच पत्रा, भंगार वेचक, मंडप व्यावसायिक यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पिंपरी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात युवासेना पिंपरी विधानसभा विभाग संघटक निलेश हाके यांनी स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, औद्योगिक नगरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व क्षेत्रातील कामकाज ठप्प झाले असून नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याची दखल घेत महापालिकेच्यावतीने दारिद्र रेषेखालील (पिवळे रेशनकार्डधारक) नागरिक व कचरा, काच पत्रा, भंगार वेचक यांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे. तसेच शहरातील मंडप व्यवसायिक यांचा सुद्धा अर्थसहाय्य योजनेमध्ये समावेश करून घेण्यात यावा.






















Join Our Whatsapp Group