पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचे सभापती, नगरसेविका चंदा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिकांना मास्क, साबण आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सागर आंघोळकर, माजी नगरसेवक राजु लोखंडे, माऊली जगताप आदी उपस्थित होते.
नगरसेविका चंदा लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.२९ पिंपळे गुरव येथील नागरिकांना ८ हजार सॅनिटायझर बॉटल आणि ८ हजार डेटॉल साबण तसेच १६ हजार मास्कचे वाटप करण्यात आले.
रोहन लोखंडे, अक्षय शिंदे, अशोक लोखंडे, विनोद लोखंडे, दिनेश लोखंडे, राहुल लोखंडे, यश गायकवाड, शंकर लोखंडे, अजय लोखंडे, मोहन लोखंडे, रोशन लोखंडे, मंथन लोखंडे, ओमकार लोखंडे, उदय लोखंडे, दीपक लोखंडे, विशाल लोखंडे, गणेश लोखंडे, रोनक शिंदे, लक्ष लोखंडे, नवनाथ लोखंडे, शेखर लोखंडे, या कार्यकर्तेद्वारे वाटप करण्यात आले.