पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नऊ कर्मचा-यांच्या कुटूंबियांना आज २५ लाख रूपयांच्या विशेष मदतीचे धनादेश महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले.
जैव विविधता समितीच्या सभापती उषा मुंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
महापालिकेने यापूर्वीही मयत तेरा कर्मचा-यांना अशा प्रकारची विशेष मदत केली होती. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या शिफारशीने ही विशेष मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सदर रकमेतून आपल्या मुलांचे शिक्षण व भविष्य घडविण्यासाठी या रकमेचा वापर करावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले.
मयत कर्मचा-यांची नावे पुढील प्रमाणे – अकबर हाशम सय्यद, रमेश जगताप, राजेंद्र तुपे, काळुराम नलावडे, विनायक फापाळे, अलका साळवे, मोहन डिगोळे, रामदास राखपसरे व पंडीत कुटे.





















Join Our Whatsapp Group