पिंपरी (Pclive7.com):- जर्वरी सोसायटीतील नागरिक रस्त्याची समस्या, मेन गेटची समस्या व इतर विविध समस्यानी त्रस्त होते. या समस्यांची दखल घेत माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी जर्वरी सोसायटीमध्ये थेट नागरिकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
या अडचणींवर महानगरपालिकेतील स्थापत्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यासोबत जर्वरी सोसायटीमध्ये आज दि. 3 जुलै 2021 रोजी बैठक घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करून लगेच समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.
यावेळी महानगरपालिकेचे प्रभाग इंजिनियर नरेश जाधव, स्मार्ट सिटीचे इंजिनियर स्वामी तसेच जर्वरी सोसायटीचे चेअरमन गौरव नागरे व पदाधिकारी सागर बीरारी, चेतन खैरनार, अमोल मराठे, जॉर्ज जोसेफ, पराग खोकले, अनिल देसाई, गणेश देवकुळे, आशुतोष आजबे, गोपाल तलरेजा व ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण पाटील व सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group