पिंपरी (Pclive7.com):- पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी. घरातील पाणी साठविण्याची भांडी पाणी वापरुन रिकामी आणि कोरडी करावी. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा पाणी भरावे. घरातील पाण्याचा टाक्या पूर्णपणे झाकण लावून बंद ठेवाव्यात.
घरातील फ्लॉवर पॉट, कुलर आणि फ्रिज ट्रे’ मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावी किंवा साठलेले पाणी वाहते करावे.
घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. सर्वानी मच्छरदाणीचा वापर करावा. डासांच्या उत्पत्तीस आळा बसण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महापालिकेचे पवन साळवे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group