पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये सोशल डिस्टनसिंग पाळून आषाढी एकादशी निमित्त वृक्ष व ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले.

सर्व विद्यार्थीनी वारकऱ्यांचा वेष परिधान करून दिंडीमध्ये ज्ञानोबा माउली तुकारामचा जयघोष व हरिनामाचा जयजयकार करीत मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते पोपट नखाते यावेळी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते पोपट नखाते यांच्या हस्ते दिंडी व ग्रंथ पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी संताचे भाषण, अभंग, गवळण, फुगड्या सादर केले. डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन विठू नामाचा जयजयकार केला. गळ्यात टाळ अडकवून ‘ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम ‘म्हणत दिंडीत सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी आणि आभार केतकी पाटील यांनी केले.





















Join Our Whatsapp Group