पिंपरी (Pclive7.com):- सर्व सामान्य नागरिकांसाठी आहोरात्र झटणाऱ्या आणि नागरिकांविषयी त्यांची असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन आकुर्डीतील दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिराचे उदघाटन माजी मंत्री, पक्ष प्रतोद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर शिबीर आकुर्डी येथील हॉटेल सिल्वर सेवन, बजाज पेट्रोल पंप मागे, धनश्री हॉटेल जवळ शनिवार दिनांक 31 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या कालावधीत घेण्यात आले आहेत.
यावेळी आयोजित उपक्रमात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. या रक्तदान शिबीरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लुटूथ हेडफोन भेट देण्यात येणार आहे. तसेच मोफत रक्त तपासणी (आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या), मोफत सिटी स्कॅन (CT Scan), मोफत एम आर आय (MRI), मोफत एक्स रे (X Ray), मोफत दंत तपासणी (डेंटल XRay मोफत), मोफत नेत्र तपासणी (45 वर्षापुढील नागरिकांना मोफत चष्मा वाटप), मोफत स्त्री रोग तपासणी आदींचा समावेश या शिबीरात होणार आहे.
या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच या शिबीरात आलेल्या नागरिकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर आवश्यक त्या चाचण्या केल्या जातील. तपासणीसाठी येताना नागरिकांनी आपले जुने रिपोर्ट घेऊन यावेत. असे आवाहन झाकीर रमजान शेख यांनी केले आहे.
या शिबीराचे संयोजन झाकीर रमजान शेख, शानुर हमीद शेख, आयोजक आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघ, प्रगती महिला विकास मंडळ, आपुलकी मित्र मंडळ, समस्त जावेद शेख मित्र परिवार यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group