पिंपरी (Pclive7.com):- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना मावळ लोकसभा व युवासेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली.
कोकण भागातील बांधवांना सावरण्यासाठी युवा सेनेच्यावतीने छोटीशी मदत खेडचे युवा आमदार योगेश कदम व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
त्यावेळी युवासेना मावळ संपर्क प्रमुख राजेश पळसकर, जिल्हासमन्वयक शिवभक्त अनिकेत घुले, रुपेश कदम, राजेंद्र तरस, माऊलीद जगताप, निलेश हाके, विशाल दांगट पाटील, अविराज जाधव आदी उपस्थित होते.