पिंपरी (Pclive7.com):- पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणातील महाड तळिये आणि चिपळूणसह अन्य भागातील पूरग्रस्त नागरिकांना राज्यभरातून शक्य ती मदत विविध राजकीय पक्ष, संस्था संघटनानांकडून सुरु आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली, मोरवस्ती येथील राहुल सर्जेराव (आबा) भोसले (शिवसेना समन्वयक पुणे जिल्हा) व छत्रपती शासन सामाजिक संघटना पुणे यांनी मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती भागातील नागरिकांना आवाहन करून ट्रकभरून जीवनावश्यक साहित्यांची मदत पूरग्रस्तांना केली आहे.
सर्जेराव आबा भोसले (समन्वयक भोसरी), यांच्या हस्ते ट्रकसमोर श्रीफळ वाढवून हा ट्रक पुरग्रस्तांसाठी महाड आणि चिपळूण रवाना करण्यात आला. राहुल सर्जेराव भोसले (शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक), छत्रपती सामाजिक संघटना पुणे संस्थापक – सागर साबळे, सतीश डीसले (विभागप्रमुख), युवासेना शाखा मोरेवस्ती, युवासेना शाखा घरकुल मधील सर्व पदाधिकारी व सर्व युवसैनिक आदी उपस्थित होते. ही सर्व मदत रायगड (महाड) मधील पूरग्रस्तांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील काही गावात जाऊन सुमारे ७०० कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल इतकी मदत देण्यात आली. व तेथील कोकण महाड विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांच्याकडे ३०० किट देण्यात आले. या साहित्यामध्ये धान्य, कडधान्य, नवीन कपडे व जर्किंग, चादरी, ब्लँकेट, चटई, जीवनावश्यक साहित्याचे किट, बिस्किट आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देण्यात आले आहेत.
चिखली, मोरेवस्ती परिसरात कोकणी समाजबांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांचा माध्यमातून महाड आणि चिपळूण परिसरातील पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. संकटात असलेल्या आपल्या समाजबांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार युवा सेना शाखा मोरेवस्ती, युवासेना शाखा घरकुल आणि छत्रपती शासन सामाजिक संघटनेतील पवन मस्के, महेश भांडवलकर, सागर लोखंडे, गणेश सरवदे, निलेश जाधव, दादासाहेब खरात, ओमकार रणखांब, मंगेश जाधव, गजानन कदम, ऋषिकेश सुर्वे, तेजस मस्के, अशिक यादव, किशोर जाधव, सूरज चापले, राम चौहान, गणेश काळे, सागर मस्के, रोहित रांजणे, ऋतिक बारवकर, अजय साळवे, शुभम कदम, ओमप्रकाश हाळनर, माणिक पोटभरे, महेश खताळ, अजिंक्य घाडगे, अनिकेत गायकवाड, संकेत बोडके, विकास वामन, यांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य रायगड (महाड) पूरग्रस्ताकडे सुपूर्द करण्यात आले.























Join Our Whatsapp Group