पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दि. १ ऑगस्ट ते दि. ५ ऑगस्ट अखेर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महापालिका अधिका-यांचा देखील विशेष प्राविण्य आणि समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महापालिकेचे दंतशल्यचिकीत्सक डॉ. यशवंत इंगळे आणि प्रफुल्ल पुराणिक यांचा समावेश आहे.
डॉ. यशवंत इंगळे जुलै १९९२ पासून महापालिका सेवेत दंतशल्यचिकीत्सक पदावर कार्यरत आहेत. त्यांना दंत शास्त्रातील ऑस्कर समजला जाणार आऊट स्टँडींग डेंटीस्ट हा देशपातळीवरील सन्मान नुकताच प्राप्त झाला आहे. त्यांनी कोविड पश्चात होणा-या म्युकरमायकोसिस या आजारामधील जबड्याच्या अत्यंत कठीण व जोखमीच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यामुळे महापालिकेच्या लौकीकात भर पडली आहे. याबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांचा “विशेष प्राविण्य” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
तर माहिती व जनसंपर्क विभागाकडील प्रफुल्ल पुराणिक यांचेकडे जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रमांचे नियोजन आहे. सर्वच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाबद्दल तसेच या वर्षीच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केल्याबद्दल त्यांचा शाल स्मृतीचिन्ह आणि पुस्तकासह “समाज मित्र” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसेविका अनुराधा गोरखे ,अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप , लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे उपस्थित होते तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष संजय ससाणे, सचिव शिवाजी साळवे, खजिनदार नितीन घोलप, मुख्य संघटक वसंत वावरे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, मोहन वाघमारे, आबा मांढरे, संदिप जाधव, संतोष नेटके, सुरेश मिसाळ, विष्णू लोखंडे, विष्णू गायकवाड, संजय ढावरे, राजु आवठे, मधुकर गवारे, सविता आव्हाड, मुख्य मार्गदर्शक भाऊसाहेब अडागळे, प्रल्हाद सुधारे, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडमल, हनुमंत (नाना) कसबे, सुरेश जोगदंड, अण्णा लोखंडे, रामदास कांबळे, सुनिल भिसे, झुंबरताई शिंदे, केसरताई लांडगे, आशाताई शहाणे, अरुण जोगदंड, सतिश भवाळ, दत्तू चव्हाण, राम पात्रे, रविंद्र खिलारे, सहसचिव विठ्ठल कळसे, राजेश अडसूळ, तानाजी साठे, गणेश साठे, उमेश कांबळे, सहखजिनदार बालाजी मोरे, विजय कांबळे, सल्लागार मोहन भिसे, अनिल सौदंडे, महेश खिलारे, सोशल मिडीया प्रमुख किशोर हातागळे, ऋषिकेश कसबे, पसिध्दी प्रमुख विशाल कसबे, संतोष रणसिंग, संघटक बालाजी गवारे, अविनाश लांडगे, सूत्रसंचालक भानुदास साळवे, महिला कमिटी कुसुम कदम, मिना कांबळे, पुनम क्षीरसागर, अन्नदान समिती अण्णासाहेब कसबे, संरक्षण समिती प्रमुख स्वप्रिल वाघमारे, मयूर घोलप ,अक्षय उदगीरे, आकाश अडागळे उपस्थित होते.