पिंपरी (Pclive7.com):- कोरोना प्रतिबंधक लशींचा महापालिकेला पुरेशा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (शुक्रवार दि.२०) रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. सुरुवातीला आरोग्य अधिकारी, कर्मचारी व फ्रंट लाइन वर्कर यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर १८ वर्षांपुढील नागरिकांचेही लसीकरण सुरु झाले. महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या ६९ व खासगी १३२ केंद्रांवर व्यवस्था केली आहे.
सद्यःस्थितीत कोविन ॲपवर ऑनलाइन नोंदणी, ऑन दि स्पॉट नोंदणी, किऑक्स यंत्राद्वारे टोकन घेऊन नोंदणी अशा पद्धतीने लसीकरण केले जात आहे. कालपर्यंत १२ लाख ८० हजार २४७ जणांनी लस घेतली.
गेल्या काही दिवसांपासून लशीची कमतरता आहे. मागणीप्रमाणे लस उपलब्ध होत नाही. पुरेशा लशींअभावी अनेक केंद्रे बंद केली आहेत. महापालिकेला लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उद्या (दि.२०) रोजी महापालिकेची सर्वच लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.






















Join Our Whatsapp Group