पिंपरी (Pclive7.com):- पुण्यातील बिबवेवाडी भागातील कबड्डी खेळाडू मुलीची निर्घृण हत्त्या करण्यात आली. त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नायब तहसीलदार श्री.धमाले यांना पिंपरी युवासेना व मैत्री ग्रुपच्या वतीने करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ समस्थ दापोडी व फुगेवाडीकरांच्या वतीने सर्व राजकीय, सामाजिक, कला, औद्योगिक, क्रीडा, शैक्षणिक, संघटना यांनी मैत्री ग्रुप व पिंपरी युवा सेना यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्या पीडितेला श्रद्धांजली वाहून त्या नराधमांचा जाहीर निषेध करण्यात आला.