नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नाला यश
पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.२० कासारवाडी येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय कासारवाडी ह्या नवीन प्रकल्पाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते भूमिपूजन आज (दि.२८) सकाळी ११ वाजता करण्यात आले.
यावेळी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक शाम लांडे, नगरसेविका सुजाता पलांडे, नगरसेवक माउली थोरात, सामाजिक कार्यकर्ते राजू शेळके, रमेश बाप्पू लांडगे, अमोल मोटे ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्री.महाले, श्री. बबनराव टोपे, शरद बांगर, देवराम तनपुरे, रतन लांडगे, सयाजी लांडे, संजय लांडे, कैलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय कासारवाडी ह्या प्रकल्पामध्ये २४ वर्ग असून १ ली ते १० वी पर्यंतचे मराठी मध्यम मधून शिक्षण देण्यात येणार आहे.
तळमजल्यावर पोस्ट ऑफिस, आरोग्य ऑफिस, प्राचार्य कार्यालय, शिक्षक कार्यालय, पहिल्या मजल्यावर स्टाफ रूम, ऑफिस, मिटिंग हॉल, तिसऱ्या मजल्यावर आर्ट आणि क्राफ्ट हॉल, चौथ्या मजल्यावर सांस्कृतिक हॉल, पाचव्या मजल्यावर प्रयोगशाळा अशा प्रकारे अत्याधुनिक इमारत होणार असून तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण सुद्धा करण्यात येणार आहे.
सदर प्रकल्प बांधण्यासाठी १३ कोटी ३७ लाख एवढा खर्च होणार आहे. कार्यक्रमावेळी महापौर ढोरे यांनी नगरसेवक शाम लांडे यांच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.























Join Our Whatsapp Group