आळंदी (Pclive7.com):- समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यादिनाचे औचित्य साधून तसेच मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटन या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व राष्ट्रपती पोलिस पदकाचे मानकरी संपतराव जाधव यांना मानवरत्न पुरस्कार मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटनेचेे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश केदारी यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले.
संपतराव जाधव सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्य करत महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. आपल्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेच्या वतीने जाधव यांना ‘मानवरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले आहे असे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश केदारी यांनी सांगितले.
जाधव यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान शिबीरे, स्वछता अभियान, प्लास्टिक मुक्ती अभियान, महिलांचे प्रशिक्षण वर्ग, दिव्यांगांना मदत, जेष्ठ नागरिकांना सहकार्य इत्यादी अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांतून गरीब व सर्वसामान्य लोकांना सहकार्य, स्मशाभूमीत फळ झाड लागवड व संवर्धन, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनेसाठी प्रयत्न याच बरोबर ग्रामविकासाच्या नवं नवीन अनेक संकल्पना कश्या राबविल्या जातात याबद्दल मार्गदर्शन केले आहेत. यावेळी जाधव यांनी हा पुरस्कार त्यांच्या या सेवाकार्याशी निगडित असणा-या प्रत्येक व्यक्तीला समर्पित केला आहे.
























Join Our Whatsapp Group