चिंचवड (Pclive7.com):- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिम्मित रहाटणी येथे आयोजित केलेल्या मोफत ॲक्युप्रेशर थेरपी शिबिराचा एकूण १२०० नागरिकांनी लाभ घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित रहाटणी येथे कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्र.२७ मधील नागरिकांसाठी मधुमेह, थायरॉइड, किडनीचे विकार, लिव्हरचे विकार, हृदय विकार, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या ॲक्युप्रेशर थेरपीचे मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा सुमारे १२०० नागरिकांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक कैलास थोपटे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता कारभारी, प्रकाश गायकवाड, सखाराम रानवडे, माणिक थोरात, संतोष परसे, रघुनाथ जठार, विजय निकम, नंदू पाटील, विकास थोपटे, प्रदीप चौधरे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष कुणाल थोपटे यांनी सर्वांचे आभार मानले.