पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी युवा सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ३० फुगेवाडी-दापोडी-कासारवाडी येथील नागरिकांना युनिवर्सल पास व आयुष्मान भारतचे कार्ड वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवडचे संपर्कप्रमुख वैभव थोरात यांच्या हस्ते पास आणि कार्डचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना वैभव थोरात यांनी पिंपरी युवासेनेच्या पदाधिकार्यांच्या कार्याचे कौतुक केले. पुढे ते म्हणाले की, समाजकार्य करताना कुठलाही धर्म, जात किंवा पक्ष न पाहता आपली मदत त्याच्यापर्यंत पोहचली पाहीजे. जात, धर्म ही समाजकार्यात पाहू नये हिच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवणूक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळेस पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, महिला शहरसंघटिका उर्मिला काळभोर, युवती अधिकारी प्रतीक्षा घुले, शिवसेना उपविभाग प्रमुख एकनाथ हाके,शीला मामी जाधव, शैला पाचपुते, अस्मिताताई कांबळे, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ शिंगोटे, अंकुश मामा जाधव, मनोज सर वाखारे, रवीभाऊ कांबळे, अक्षय गायकवाड, दीपक साळवे, प्रमोद गायकवाड, राहुल जाधव, बापू चव्हाण, राजू खलसे, उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी नगरकर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा अधिकारी निलेश हाके ह्यांनी केले होते.






















Join Our Whatsapp Group