पिंपरी (Pclive7.com):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराचे अध्यक्ष दिनेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली कुदळवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात ‘संजीवनी ब्लड बँक’ यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदान हे सर्वोच्च सामाजिक दान असून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या प्रसंगी भाजपा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्नजी काटे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, नगरसेवक संतोष मोरे,सरचिटणीस मधुकर बच्चे, कोषाध्यक्ष हेमचंद्र मासुळकर, अजित कुलथे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.




















Join Our Whatsapp Group