मुंबई (Pclive7.com):- राज्यातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात जास्त मीठ, साखर तसेच संतृप्त किंवा ट्रान्स फॅट (HFSS) असलेल्या पदार्थांच्या विक्री, जाहिरात आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शाळांच्या आवारात व परिसरात वडापाव, समोसा, केक, पेस्ट्री, मैद्यापासून बनविलेले पदार्थ, पाकीटबंद चिप्स, कोल्ड्रिंक्स व अन्य जंकफूडची विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळा, कँटीन, पुरवठादार किंवा विक्रेत्यांवर सुधारणा सूचना, दंड, ‘एफएसएसएआय’ परवाना निलंबित किंवा रद्द करणे, तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे ‘एफडीए’ आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group