पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्त्या किर्तीताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.१२ मधील नागरिकांसाठी मोफत स्मार्ट कार्ड शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत ६५० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
प्रभाग क्र.१२ – घरकुल, शरदनगर, हरगुडेवस्ती, नेवाळेवस्ती, भीमशक्तीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या किर्तीताई जाधव यांचा वाढदिवस २० फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त प्रभागातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१५ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत हे शिबीर संपन्न होत आहे. यामध्ये युनिवर्सल पास, स्मार्ट आधार कार्ड, स्मार्ट पॅन कार्ड, स्मार्ट उद्योग कार्ड, स्मार्ट ई-श्रम कार्ड व स्मार्ट मतदान कार्ड पूर्णपणे मोफत काढून देण्यात येत आहे.
या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत ६५० हून अधिक नागरिकांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत. किर्तीताई जाधव यांच्यावतीने आयोजित या उपक्रमांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.